कारवर दुचाकी आदळल्याने शिरसोलीतील प्रौढाचा अपघाती मृत्यू


जळगाव : कारवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात निलेश केशव बारी (44, मूळ रा.शिरसोली, ह.मु.शास्त्रीनगर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 13 जुलै रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीत घडला. दरम्यान, बारी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवणण्यात आले असता त्यांची त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

घरी जाताना गाठले मृत्यूने
मूळचे शिरसोली येथील निलेश बारी हे सद्या कुटुंबियांसह गिरणा टाकी परिसरातील शास्त्री नगरात वास्तव्यास होते. शेती करून ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते सागर पार्ककडून घराकडे जात असतांना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीतून (एम.एच.16 बी.वाय. 7555) क्रमांकाच्या कारने जात होते. यावेळी अचानक कार समोर आल्याने दुचाकीस्वार निलेश बारी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते समोर आलेल्या कारवर आदळले. हा अपघात इतका जोरदार होता की, दुचाकीस्वार हे थेट कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निलेश बारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या शरिरातून रक्तस्त्राव सुरु होता. ते रक्ताच्या थारोळ्यात सुमारे अर्धा तासापर्यंत पडलेले होते. यावेळी त्याठिकाणाहून जाणार्‍या एका तरुणाने जखमी बारी यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अमोल पाटील यांनी तपासणी करत मयत घोषीत केले. ब

निलेश बारी यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. दरम्यान, काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. त्यानुसार निलेश बारी यांचे वडील व पत्नीने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांचा मृतदेह बघताच त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !