केर्‍हाळे गावात वीज चोरी : दंड न भरल्णार्‍या नऊ वीज ग्राहकांविरोधात गुन्हा


यावल : रावेर तालुक्यातील केर्‍हाळे येथे 30 मे 2023 रोजी विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. गावात पथकास नऊ जण वीज चोरी करतांना आढळले. सर्व 9 जणांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारणी करून नोटीस बजावून दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र या सर्वांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात रविवारी नऊ जणांविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे वीज चोरी प्रकरण
केर्‍हाळे, ता.यावल येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने सहायक अभियंता श्रीकृष्ण मधुकर बुरकुल यांनी 30 मे 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजता केर्‍हाळे गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली होती. यामध्ये त्यांना तापाबाई हरी महाजन, भावजी देवचंद पाटील, कमल गोविंद राठोड, रेखाबाई बाबुराव महाजन, गोपाल माधव पाटील, फिरोजशा फकीर, सखुबाई शंकर पाटील, सीताराम गरबड बाविस्कर व कडू भिकारी धनगर हे नऊ जण वीज चोरी करतांना आढळून आले. या सर्व नऊ जणांनी एकूण तीन हजार 240 युनिट वीज चोरी केल्यानंतर या सर्वांना 56 हजार 28 रुपयांचा दंड आकारून प्रत्येकाला नोटीस देण्यात आली मात्र या सर्व नऊ जणांनी वेळेत दंड अदा केला नसल्याने सर्वांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात रविवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासाकरिता हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !