बामणोद येथील कुंभारवाडा भागात तिघांना मारहाण ; सहा जणांविरोधात गुन्हा


यावल : यावल तालुक्यातील बामणोद या गावात कुंभारवाडा भागातून दुचाकीद्वारे खळ्यात गुरांना चारा टाकण्यासाठी जात असलेल्या इसमासोबत मागील भांडणातून सहा जणांनी वाद घातला. नंतर वाद वाढत गेल्याने या इसमासह त्याचा मुलगा व सुन यांना सहा जणांनी मारहाण केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रविवारी सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
बामणोद, ता.यावल येथे शुक्रवार, 5 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अनिल जावळे हे दुचाकीद्वारे आपल्या खळ्यात गुरांना चारा टाकण्यासाठी जात होते. कुंभार वाड्याजवळ दीपक नरेंद्र जावळे, रजनी नरेंद्र जावळे, सुशीला ज्ञानदेव जंगले, सतीश भास्कर राणे, ज्ञानदेव बाळू जंगले व नरेंद्र भागवत फिरके (सर्व रा.बामणोद) या सहा जणांनी त्यांना अडवले आणि मागील जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी जावळे यांचा मुलगा योगेश जावळे व सुन अश्विनी जावळे या आल्या त्यांनादेखील त्यांनी मारहाण केली. सहा जणांनी तिघांना मारहाण करीत लाकडी काठीने त्यांच्या पायावर पाठीवर वार करीत दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रविवारी सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !