रावेरनजीक भरधाव बसची दुचाकीला धडक : आमोद्यातील विवाहिता ठार
Rushing bus collides with two-wheeler near Raver : Married woman from Amodia killed रावेर : भरधाव एस.टी.बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 35 वर्षीय विवाहिता ठार झाली तर दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी बस चालकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. आरती संदीप पाटील (35, रा.बामणोद, ता.यावल, ह.मु.आमोदा, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
जागीच विवाहिता ठार
यावल तालुक्यातील आमोदा येथील संदीप पाटील व त्यांच्या पत्नी आरती या बंभाडा (मध्यप्रदेश) येथून दुचाकी (एम.एच.14 ए.क्यू.1196) ने विवाह समारंभाला गेले होते व सोमवार, 15 रोजी सायंकाळी आमोदे येथे येत असतांना येथील बालाजी टोल काट्याजवळ अहिरवाडीकडून रावेरकडे येणारी बस (क्रमांक एम.एच.14 बी.टी.3916) ला मागून जोरदार धडक दिल्यामुळे आरती संदीप पाटील (35) या खाली पडून जागीच ठार झाल्या तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

आरती यांच्या मृतदेहावर रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संदीप पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात बस चालक शेख तौफिक शेख रफीक (फैजपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
