शेतात विवाहितेवर अत्याचार : जामनेर तालुक्यातील घटना
Atrocities on married women in fields: incident in Jamner taluka जळगाव : जामनेर तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर शेतात एकटी असल्याचा फायदा घेत पतीला व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. ही घटना 21 जुन रोजी घडली. याप्रकरणी चौकशीअंती अखेर पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे.
शेतात केला अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात विवाहिता आल्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. शेती करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. 21 जून रोजी दुपारी 3 वाजता महिला व तिचे पती शेतात काम करत असताना पती हे बियाणे घेण्यासाठी व मुलांना शाळेतून आणण्यासाठी शेतातून गावात निघून गेले. त्यावेळी त्यांच्या गावात राहणारा शंकर रमेश धनगर (रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) याने महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला तसेच मुलगा आणि पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शंकर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.
