भुसावळातील नवोदय विद्यालयामागे तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला


The decomposed body of the youth was found behind Navodaya Vidyalaya in Bhusawal भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 20 ते 22 वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे ?याबाबत शवविच्छेदन अहवालाअंती सांगता येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. भुसावळ तालुका पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक 317/1 मधील दक्षिण बांधालगत 20 ते 22 वर्षीय तरुण कुजलेला व नग्न अवस्थेतील मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आदींनी धाव घेतली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !