जळगावात घरात घुसून मारहाण करत सामानाची तोडफोड
जळगाव : दाखल केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन सहा जणांनी अनधिकृतरित्या घरात प्रवेश करत कुटुंबातील सदस्यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन सामानाची तोडफोड केली. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात ही घटना मंगळवार, 16 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
केस मागे घेण्याच्या वादातून तोडफोड
मेहरुनिसा शेख कैय्युम शेख ( वय 30, रा. पिंप्राळा हुडको) यांनी संशयितावर केस दाखल केली होती. ही केस मागे घेण्याचे कारण पुढे करत सहा जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. मेहरुनिसा शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संशयितांनी चापटा बुुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यानंतर धमकावले. घरगुती वापरातील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. या प्रकरणी तक्रारीनुसार नुर मोहम्मद शेख लतीफ ( रा. अक्सानगर हुडको), सोहेब पुर्ण नाव माहित नाही, अर्शद, अंजुम शेख, फरदी, एक अनोळखी (रा. सर्व ख्वॉजानगरी हुडको) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा शुक्रवार, 19 रोजी दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. तपास ग्रे.पीएसआय संजय चौधरी करीत आहेत.

