कोळवद शेत शिवारात 42 वर्षीय महिलेला सर्पदंश


यावल : यावल तालुक्यातील कोळवद येथील शेत शिवारात शेतात काम करतांना 42 वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. हा प्रकार निर्दशनास येताच महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

कोळवद, ता.यावल येथील शेत-शिवारात वंदना प्रमोद ढाके (42) या शनिवारी निंदणी करीत असताना त्यांच्या उजव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना शेतकर्‍याने तेथुन यावल ग्रामीण रुग्णालयात आणले येथे. वैद्यकिय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ. सौरव भुताने, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, माधुरी ठोके, कादर तडवी आदींनी प्रथमोपचार केले. महिलेची प्रकृती स्थिर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !