शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई : गावठी पिस्टलासह दोघांना पकडले


Shanipeth Police’s big operation : Gavathi caught two people with pistol जळगाव : गावठी पिस्टल बाळगणार्‍या दोघांना जळगावच्या शनी पेठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवार, 21 जुलै रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली. गणेश हिमंत कोळी (23, रा.धानोरा, ता.चोपडा, जि.जळगाव, ह.मु.मोहाडी, ता.जळगाव) व विनय जितेंद्र कोळी (34, रा. मोहाडी, ता.जि.जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत गणेश कोळी हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना कळताच त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व सोबत अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, विकी इंगळे, रवींद्र साबळे, अमोल वंजारी यांनी कारवाई करत संशयित आरोपी गणेश कोळी याला ताब्यात घेतले. संशयीताला कट्ट्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने हा गावठी कट्टा मित्र विनय जितेंद्र कोळी याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहाडी शिवारातील उमेश पार्क येथील शेतात जाऊन गोठ्यातून गावठी कट्टा जप्त करीत विनयलाही अटक केली.

कॉन्स्टेबल अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !