किनगाव येथील वर्कशॉपमध्ये लावलेली दुचाकीसह साहित्य लंपास


यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील वर्कशॉपसह वॉशिंग सेंटरमध्ये लावलेली मोटरसायकल व सबमर्सिबल पंपाचे साहित्यदेखील चोरट्याने रविवारी पहाटे पूर्वी लांबवले. चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आला. चोरी करतांना चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीत चोरटा कैद
किनगाव, ता.यावल येथील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गालगत सुरेश किसन चौधरी यांचे राजमान्य इंजिनिअरिंग वर्कशॉप, वाशिंग सेंटर नावाचे दुकान आहे. या दुकानात रविवारी पहाटेपूर्वी एक अज्ञात चोरटा शिरला व त्याने दुचाकी क्रमांक (एम.एच.19 सी.डी.0290) ही लांबवली व सबमर्सिबल पंपाचे पितळी बुशिंग तसेच वेल्डिंगची वायर लांबवली. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यावल पोलिसात सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !