पाल येथून तीन लाख रुपये किंमतीची क्रुझर लांबवली


रावेर : रावेर तालुक्यातील पाल येथून पार्किंगमध्ये लावलेली फोर्स कंपनीची सिल्व्ह रंगाची क्रुझर चारचाकी चोरट्यांनी लांबवली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

संधी साधत लांबवली चारचाकी
चेतन बापूजी चव्हाण (गाळण, ता.पाचोरा) यांनी शनिवार, 20 रोजी रात्री 11.30 वाता पाल गावाजवळील खरगोन रोडवरील पार्किंगमध्ये त्यांची सुमारे तीन लाख रुपये किंमतीची क्रुझर (एम.एच.46 एएल 0835) लावली होती. अज्ञात संधी साधून वाहन लांबवले. चव्हाण यांनी
रावेर पोलिसात दिलेल्या माहितीवरून चोरीची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जगदीश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !