बक्षीपूरच्या केळी व्यावसायीकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
रावेर : विहिरीत पाय घसरून पडल्याने बक्षीपूर गावातील रहिवासी असलेल्या केळी व्यावसायीकाचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अभोडा शेत-शिवारातील श्रावण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून बक्षीपूर येथील जगदीश ज्ञानेश्वर महाजन (42) यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रवीण महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील करीत आहेत. जगदीश हे वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर पुंडलिक महाजन यांचा एकूलता एक मुलगाय होय. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

