यावल-फैजपूर रस्त्यावर रस्ता लूट : यावल शहरातील दोघांना अटक


Road robbery on Yaval-Faizpur road : Two arrested in Yaval city यावल : यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ एका सेल्समनचे वाहन अडवून त्यास मारहाण करीत दोघांनी 39 हजार 700 रुपयांची रोकड हिसकावत दुचाकीवरून पळ काढला होता. ही घटना 25 जुलै रोजी रात्री 10 वाजता घडली होती. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. यावल पोलिसांच्या मदतीने शनिवारी शहरातील आयेशा नगरामधून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटीतील रक्कम जप्त करण्यात आली.

असे आहे लूट प्रकरण
यावल-फैजपूर रस्त्यावर 25 जुलैच्या रात्री दहा वाजता चेतन गोपाल दरेकर हे सेल्समन आपले वाहन (क्रमांक एम.एच.19 सी. एक्स. 0350) व्दारे यावलकडे येत असताना हिंगोणा गावाजवळ दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांची दुचाकी अडवत त्यांच्याकडील 39 हजार 700 रुपयाची रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास फैजपूर विभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद व यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार असलम खान दिलावर खान यांनी करीत यावल शहरातील आयेशा नगरात फरदीन कदीर पटेल व सोहेल रुबाब पटेल या दोघांना अटक केली. संशयीतांनी जबरी लूटरीतील रोख रक्कम पोलिसांना काढून दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !