तरुणाची आत्महत्या : प्रियकरासह पत्नीची कोठडीत रवानगी


Suicide of a young man : Wife sent to custody with lover यावल : प्रियकरासोबत पत्नी एक वर्षीय बाळाला घेवून पळून गेल्यानंतर मोहराळा येथील तुषार गोपाळ पाटील (28) या तरुणाने 19 जुलै रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रियकर प्रशांत सहदेव पाटील (रा.मोहराळा) व वैष्णवी तुषार पाटील यांच्याविरोधात शनिवार, 27 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावल पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र कोठडीची मुदत सोमवारी संपल्यावर दोघांना यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोघांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !