धुळ्यातील दोन सराईत गुन्हेगारांवर मिनी मोक्कांतर्गत कारवाई

Action under mini Mokka against two Sarai criminals in Dhule धुळे : मिनी मोक्कांतर्गत धुळ्यातील दोघा सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. नवीन कायद्यातील तरतुदीनंतर झालेली ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचे सांगण्यात आले. तौसीफ भिकन तांबोळी (24, रा.मास्तरवाडी), फारगेट उर्फ समीर रफीक पठाण (24, रा.विटाभट्टी) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
नवीन तरतूदीनुसार प्रथमच कारवाई
जुलै महिन्यापासून लागू झालेल्या नवीन कायद्यातील तरतुदीचा आधार घेत धुळे पोलीस दलाने दोघांवर मिनी मोक्कांतर्गत कारवाई झाली. देवपूर पोलिसांनी संशयीतांना अटक केली होती. देवपूर भागातील तुषार रघुनाथ वाळके यांच्या घराबाहेरील वीज मोटार चोरीला गेल्याची घटना मंगळवार, 23 जुलैला सकाळी घडली होती. देवपूर पोलिसांनी भामट्यांना अटक केल्यानंतर त्यांनी वाळके यांची वीज मोटार चोरल्याची कबुली दिली. तौसिफ व समीर दोघ सराईत गुन्हेगार असून दोघांवर नव्या भारतीय न्याय संहितेतील किरकोळ संघटीत गुन्हेगारी कायदा अर्थात मिनी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
