यावल पोलीस ठाण्यात मद्यपी तरुणाचा पोलिसांसोबत वाद : एकाविरोधात गुन्हा


Argument of drunken youth with police in Yaval police station : Crime against one यावल : यावल पोलीस ठाण्यात 35 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करीत त्यांच्याशी वाद घातला. समजूत काढणार्‍या पोलिसाची कॉलर पकडून त्याला जमिनीवर ढकलून दिले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यपी तरुणाविरोधात गुन्हा
यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी भरत गणेश सोनवणे (35, रा.वढोदा) हा तरुण आला होता व दारूच्या नशेत त्याने पोलिसांना शिविगाळ करायला सुरुवात केली. ठाणे अंमलदार शांताराम तळेले यांनी त्याला वाद न घालण्याचे आवाहन केले मात्र तरुणाने न ऐकल्यानंतर हवालदार मुस्तफा तडवी यांनी समजूत काढली असता तरुणाने उलट हवलदार मुस्तफा तडवी यांची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुक्की करत शासकीय गणवेशाचे बटन तोडून त्यांना जमिनीवर फेकले. याप्रकरणी मुस्तफा तडवी यांच्या फिर्यादीवरून भरत सोनवणे यांच्या विरुद्ध शासकिय कामात अडथडा निर्माण करणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शArgument of drunken youth with police in Yaval police station: Crime against oneनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !