जळगावातील सरस्वती फोर्ड शोरूम परिसरात चोरी : आरोपींना अटक
जळगाव : नशिराबाद-जळगाव मार्गावरील सरस्वती फोर्ड कार शोरूमच्या परिसरात लोखंडी सामान चोरीला गेला. सरस्वती फोर्ड शोरूमचे मालक दिलीप एकनाथ बेंडाळे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली.
दोन आरोपींना अटक
शोरूमच्या परिसरातून 42 हजार रुपये किंमतीचा लोखंडी गर्डर, आसारी व इतर लोखंडी सामान चोरी झाला. नशिराबादचे एपीआय आसाराम मनोरे यांच्या पथकातील अंमलदार हवालदार युनूस शेख, शिवदास चौधरी, गिरीश शिंदे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, समीर सय्यद यांनी गुप्त बातमीच्या आधारे संशयीत आरोपी सलीम शेख कय्युम व मोहसीन बेग हसन बेग यांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास हवालदार गिरीश शिंदे करीत आहेत.