दहिगावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही संतापजनक घटना मंगळवार, 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. पीडीतेने हा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर बुधवार, 31 जुलै रोजी सुरेश साहेबराव माळी विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहिगावातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरामागे कपडे धुऊन सुखायला टाकत असताना आरोपीने पीडीतेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. घडलेला प्रकार या बालिकेने रात्री आपल्या कुटुंबाला सांगितला व बालिकेच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
