कोळन्हावीजवळ दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू


Married woman dies after falling from bike near Kolnhavi यावल : यावल तालुक्यातील कोळन्हावीजवळ दुचाकीवरून आपल्या पतीसोबत जात असतांना विष्णापूर, ता.चोपडा येथील 25 वर्षीय विवाहिता रस्त्यावर पडलकोसळली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तिला उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तुळसाबाई रमेश भील (25) असे मयताचे नाव आहे.

डोक्याला जबर दुखापतीने मृत्यू
विष्णापूर ता.चोपडा येथील रमेश भिल व त्यांची पत्नी तुळसाबाई या 15 जुलै रोजी दुपारी दोन वाजता दुचाकीद्वारे जळगाव जात असताना कोळन्हावी गावाजवळ तुळसाबाई भील या दुचाकीवरून खाली कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तातडीने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अश्विन देवचे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !