नायगाव फाट्यावर जुगाराचा डाव उधळला : दिड लाखांच्या मुद्देमासह सहा जुगारी जाळ्यात
Gambling plot foiled at Naigaon Phata : Six gamblers in the net with a sum of half a lakh मुक्ताईनगर (7 ऑगस्ट 2024) : मुक्ताईनगर-बर्हाणपूर रस्त्यावरील नायगाव फाट्यावर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकत सहा जुगारींना गजाआड करीत एक लाख 47 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सहा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या भागातील जुगार अड्ड्यांवर कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
सहा जुगार्यांवर कारवाई
पोलीस कॉन्स्टेबल राजेश महाजन यांनी प्रकरणी फिर्याद दिल्यावरून शांताराम जीवराम मंगळकर (50, बर्हाणपूर), गणेश वसंत पाटील (44, पुरणाड), महेंद्र बापूराव नाईक (35, जुने गाव, मुक्ताईनगर), युवराज संतोष महाजन (37, निंभोरा सीम, ता.रावेर), सुनील किसन बेलदार (33, कुर्हा, ता.मुक्ताईनगर), राजेश सीताराम वाकोडे (50, बाबासाहेब आंबेडकर नगर, नांदुरा) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर ते बर्हाणपूर जाणार्या रोडवरील टोल नाक्याजवळील साईराज ढाब्यामागील एका हॉलमध्ये झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना ही कारवाई करण्यात आली. संशयीतांकडून एक लाख 47 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, संतोषकुमार भारूडे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.
