भुसावळातील प्रौढाने दिव्यांगत्वाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल


भुसावळ (12 ऑगस्ट 2024)  : शहरातील पंचशील नगरातील 46 वर्षीय प्रौढाने अपंगत्वाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वसंत बाबूराव तायडे (46, पंचशील नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

तायडे यांना अपंगत्व असल्याने या त्रासाला कंटाळून घरी कुणी नसताना राहत्या घरात खिडकीच्या बिजागर्‍याला ओढणीने गळफास घेतला. बाजारपेठ पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !