भुसावळ शहरातील विवाहितेची आत्महत्या : पतीविरोधात गुन्हा
भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : पतीच्या जाचाला कंटाळून शहरातील गौसिया नगरातील 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात पतीविरोेधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
रेहाना शेख साबीर (हमीद नगर, चोपडा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी फिरदोसबी सैय्यद जावेद (21, गौसिया नगर, आशा किराणाजवळ, भुसावळ) हिने 23 जुलै 2024 रोजी सकाळी सात वाजेपूर्वी पती सैय्यद जावेद सै.हमीद (50) याच्या जाच्याला कंटाळून आत्महत्या केली होती. वेळोवेळी विवाहितेला मारहाण करून गांजपाट केला जात असल्याने त्यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याने आरोपी सैय्यद जावेद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

