भुसावळात बसस्थानकात वयोवृद्धाकडील सहा हजार लूटले : आरोपी तरुणाला अटक

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : सहा हजारांची रोकड जप्त


6,000 looted from an elderly person at a bus stand in Bhusawal : the accused young man was arrested भुसावळ (14 ऑगस्ट 2024) : नातवासोबत अभियांत्रिकीची फी भरण्यासाठी निघालेल्या वयोवृद्धाच्या खिशातून भामट्याने जबरीने सहा हजारांची रोकड हिसकावून पोबारा केला होता. ही घटना शहरातील बसस्थानकात सोमवार, 12 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली होती. बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी सुरज अशोक भांगे (23, पापा नगर, भुसावळ) यास अटक करीत रक्कम जप्त केली.

असे आहे लूट प्रकरण
रामू निंबा सुरवाडे (76, खंडाळा, ता.भुसावळ) हे नातू चंद्रकिरण सुरवाडेसोबत 12 रोजी सकाळी 10.30 वाजता जळगाव जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असताना भामट्याने त्यांच्या खिशातील सहा हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. सुरवाडे हे नातवाची अभियांत्रिकीची फी भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. भुसावळ बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर डीबी पथकाने आरोपीला अटक केली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !