मच्छीची भाजी न दिल्याने यावलमध्ये हॉटेल मालकाला मारहाण
Hotel owner beaten up in Yaval for not giving Machchi vegetables यावल (14 ऑगस्ट 2024) : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या एकाने मच्छीची भाजी जेवणासाठी मागितली मात्र त्याला मच्छीची भाजी न मिळाल्याने या कारणावरून त्याने थेट हॉटेल मालकाला शिवीगाळ करून दगड मारून फेकत त्याला दुखापत केली. ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
यावल शहरातील भुसावळ रोडवर लय भारी हॉटेल असून या हॉटेलमध्ये कैलास शंकर शंकपाळ (गंगानगर, महादेव मंदिराच्या मागे, यावल) हा जेवणासाठी आला असता त्याने मच्छीची भाजी जेवणासाठी मागितली मात्र मच्छीची भाजी न मिळाल्याच्या त्याचा राग येऊन त्याने थेट हॉटेल मालक युवराज संजय बारी (27) यालाच शिवीगाळ करून तु हॉटेल कसे चालवतो तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली आणि दगड मारून फेकत त्याच्या डोक्याला आणि डाव्या डोळ्याजवळ दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात युवराज बारी यांच्या फिर्यादीवरून कैलास शंकपाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार सुनील पाटील करीत आहे.

