काळाडोह शिवारातील केळीच्या शेतात हिंगोण्यातील महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला
फैजपूर पोलिसांकडून मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध
The decomposed body of a woman from Hingone was found in a banana field in Kaladoh Shiwar यावल (17 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा शिवारात विटवा वस्ती जवळील काळाडोह परिसरातील एका शेतात 55 वर्षीय आदिवासी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर जागेवरच पंचनामा करून महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जागेवरच केले शवविच्छेदन
हिंगोणा, ता.यावल येथुन जवळच असलेल्या विटवा आदिवासी वस्ती जवळ काळाडोह आहे. या भागात जुम्मा बलदार तडवी यांचे शेत गट क्रमांक 1226 आहे. त्यामध्ये त्यांनी केळी लावली आहे. या केळीच्या शेतात कारवेटीबाई कांता बारेला (55, रा.हिंगोणा, विटवा वस्ती) या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गुरुवारी मिळून आला. तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळीच यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फैजपूरचे सहा.निरीक्षक् रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयनुद्दीन सय्यद करीत आहे.

