सांगवी-चितोडा रस्त्यावर 65 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला


The body of a 65-year-old unidentified man was found on the Sangvi-Chitoda road  यावल (17 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील सांगवी ते चितोडा रस्त्यावर एका शेताच्या बांधावर 65 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह आढळला. अनोळखी असलेल्या या इसमाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटवण्याचे आवाहन यावल पोलिसांनी केले आहे.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
सांगवी, ता.यावल येथून चितोडा जाणार्‍या रस्त्यावर प्रकाश भंगाळे यांच्या शेताच्या बांधावर 65 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह गुरुवारी आढळला. यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक किशोर परदेशी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. मयताची ओळख पटलेली नसून याप्रकरणी पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !