रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू : पिंपळगाव कमानीतील घटना


पहूर (18 ऑगस्ट 2024) : रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू ओढवला. ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे आई-वडीलांकडे आलेल्या विवाहितेसोबत घडली आहे. या घटमुळे दोन वर्षाचा मुलगा आयेच्या प्रेमाला मुकला आहे. पूजा काशीनाथ पवार (21, रा.गोंदेगाव तांडा, ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे.

घरात झाला सर्पदंश
पूजा पवार ही विवाहिता आपल्या परिवारासह गोंदगाव तांडा येथे वास्तव्याला आहे. रक्षाबंधनासाठी विवाहिता माहेरी पिंपळगाव कमानी येथे आई-वडीलांकडे आली असता शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता घरी असतांना विवाहितेच्या हाताला सर्पदंश झाला. तातडीने पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. विवाहितेचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिाल दोन वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे पिंपळगाव कमानी गावात शोककळा पसरली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !