पिंप्राळ्यातील शेतकर्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू
कुर्हाकाकोडा (18 ऑगस्ट 2024) : जवळच असलेल्या पिंप्राळा गावातील 22 वर्षीय तरुण शेतकरी ईश्वर शांताराम सुशीर याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, 18 रोजी अडीच वाजेच्या सुमारास पिंप्राळा शेत-शिवारात घडली.
जागीच झाला मृत्यू
स्वतःच्या शेतात हा तरुण आई-वडिलांसह निंदणीचे काम करत होता. अचानक दुपारी वातावरण बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. जोराची विज कडाडून शेतात असलेल्या ईश्वर सुशीर याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कुटुंबीयांनी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ईश्वरच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तरुण शेतकर्याच्या मृत्यूने पिंप्राळा गावावर शोककळा ओढवली आहे.

