भुसावळात गावठी कट्टा बाळगणारा प्लंबर शहर पोलिसांच्या जाळ्यात


In Bhusawal, a plumber carrying a gavathi katta is in the net of the city police भुसावळ (19 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहर पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीताला अटक केली आहे. जगन धर्मा कोळी (44, अयोध्या नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने प्लंबर आहे. संशयीताला अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांना संशयीत जगनकडे कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. हवालदार नेव्हील बॉटले, सहायक फौजदार संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी संशयितांकडून 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. ही कारवाई 17 रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !