जळगावातील उघड्या घरातून चोरट्याने 25 हजारांची मंगलपोत लांबवली


जळगाव (19 ऑगस्ट 2024) : उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत चोरट्याने फ्रिजवर ठेवलेली सुमारे 25 हजार किंमतीची सोन्याची मंगलपोत लांबवली. बुधवार, 14 रोजी ही घटना छत्रपती शिवाजी नगरात गेंदालाल मिल परिसरात घडली. शुक्रवार, 16 रोजी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

विजय बाविस्कर (34) हे कुटुंबासह याठिकाणी वास्तव्यास आहेत. प्रवासी रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नीने फ्रिजवर त्यांच्या गळ्यातील मंगलपोत काढुन फ्रिजवर ठेवली होती. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी हेरत संशयित प्रकाश नेकराम बारेला (22, रा.कोचुर) याने घरात प्रवेश करत पोत लंपास केली. तपास सहायक फौजदार सुनील पाटील हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !