सावखेडा शिवारातील शेताच्या शेडमधून भांडे, खुर्च्या घेऊन चोरटे पसार
जळगाव (19 ऑगस्ट 2024) : पत्र्याच्या शेडमधुन स्टीलचे भांडे, लोखंडी खुर्च्या, अँगल असे सुमारे 16 हजार 400 रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले. सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील शेतातील शेडमध्ये ही घटना 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान घडली.
जीवन अत्तरदे (रा.रामानंदनगर) यांच्या मालकीचे सावखेडा शिवारात शेत आहे. याठिकाणी पत्र्याचे शेड आहे. याठिकाणी येत चोरट्यांनी साहित्य चोरुन नेले. मोहन लक्ष्मण हिवराळे (27, रा.हरिविठ्ठलनगर) यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल धनराज पाटील हे करीत आहेत.

