जळगाव जिल्ह्यात तिघांना सर्पदंश


जळगाव (19 ऑगस्ट 2024) : वेगवेगळ्या घटनेत सर्पदंश होवून तीन जणांना विषबाधा झाली. रविवार, 18 रोजी या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आश्विन सांडू राठोड (18, सुभाषवाडी), प्रकाश बारेला (23, रा.लोहारा, ता.पाचोरा), भूषण दिलीप बाविस्कर (30, रा.हातेड) या बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !