33 वर्षीय महिलेसोबत बळजबरीने लग्न करीत अत्याचार : रावेर तालुक्यातील तरुणाला अटक
Forced marriage with 33-year-old woman and torture : Youth arrested from Raver taluka रावेर (19 ऑगस्ट 2024) : रावेर तालुक्यातील एका गावातील 33 वर्षीय महिलेला दुचाकीवर सोडण्याच्या बहाण्याने विविध ठिकाणी नेत तिचा सुरूवातीला विनयभंग करण्यात आला व नंतर पीडीतेसोबत बळजबरीने आळंदी येथे जावून लग्न करीत पुन्हा जळगावात आणल्यानंतर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुरी, ता.रावेर येथील सतीश रमेश धरमकर (37) विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण
33 वर्षीय पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, 30 जुलै ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान संशयीताने पीडीतेला रावेर येथे सोडण्याच्या बहाण्याने मुक्ताईनगरातील लॉजवर नेत तिचा विनयभंग केला व नंतर जळगाव, शिर्डी व पुणे येथे नेले व आळंदी येथे तिच्यासोबत विवाहदेखील केला व नंतर जळगावात आल्यानंतर एका लॉजमध्ये पीडीतेवर अत्याचार केला. यानंतर आरोपीच्या बहिणी सुरेखाबाई रमेश सपकाळे (कानळदा रोड, जळगाव) व सुनीता मोहन कोळी (मांगी करंजी, ता.रावेर) व अभय ज्ञानेश्वर तायडे (पुरी, ता.रावेर) यांनी लग्न कसे काय केले म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

