तळवेलच्या गोदामातून कॉपरची चोरी : चौघा आरोपींना अटक


Theft of copper from Talvel godown : Four accused arrested भुसावळ (19 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे गोदामातून कॉपरची चोरी झाल्याची घटना 16 ते 17 ऑगस्टदरम्यान घडली होती. याप्रकरण वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघा आरोपींना अटक करण्यात आली.

चौघा आरोपींना अटक
सुनील अशोक पाटील यांचे तळवेलला रिवाईडिंगचे दुकान आहे. 16 ते 17 ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी पाटील यांच्या गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत 60 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लांबवली. वरणगावचे सहा.निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय श्रावण जवरे, हवालदार प्रमोद कंखरे, कॉन्स्टेबल मनोज म्हस्के, कॉन्स्टेबल फिरोज पठाण, कॉन्स्टेबल सचिन गुमळकर यांनी तातडीने तपासचक्र फिरवत संशयीत अविनाश सुरवाडे, अजय सुरवाडे, प्रज्ञेश उर्फ जितू सुरवाडे, सुमित सुरवाडे (तळवेल) यांना अटक करीत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !