भुसावळातील एकात्मिक बालविकास केंद्रातून 58 हजारांचे साहित्य लांबवले


Materials worth 58 thousand were extended from the Integrated Child Development Center in Bhusawal भुसावळ (20 ऑगस्ट 2024) : शहरातील पंचशील नगरातील एकात्मिक बालविकास केंद्रातून (अंगणवाडी) चोरट्यांनी 58 हजारांचे साहित्य लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
अंगणवाडी सेविका संध्या सिद्धार्थ तायडे (65, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पंचशील नगरात एकात्मिक बालविकास केंद्र आहे. 12 ते 17 ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी अंगणवाडीचा पाठीमागील दरवाजा व खिडकी तोडून आत प्रवेश करीत स्टीलच्या कोठ्या, बादल्या, हंडा, कळशी, ताटल्या, छोटे-मोठे चमले, पातेले, इलेक्ट्रीक शेगडी, पाण्याची मोटार, वॉटर फिल्टर, लोखंडी खिडकी, पाण्याची टाकी, पुरण यंत्रण, जर्मल टाकी आदी साहित्य मिळून 58 हजार 260 रुपयांचे साहित्य लांबवले. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !