एमपीतील दुचाकी चोरटा सावदा पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : रोझोद्यातील दुचाकी जप्त


A two-wheeler thief in MP in the trap of the Savada police सावदा (20 ऑगस्ट 2024) : सावदा पोलिसांनी रोझोदा येथील दुचाकी चोरीच्या अवघ्या काही तासानंतर आरोपीला अटक केली आहे. दिनेश लखन बारेला (36, खयडी-बरडी, प्रिंप्रीजवळ, ता.भिकनगाव, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

अवघ्या काही तासात आरोपी जाळ्यात
रोझोदा येथील कमलाकर एकनाथ पाटील (54) यांची 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी 17 ते 18 ऑगस्टदरम्यान चोरीला गेली होती. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी दिनेश बारेला यास अटक केली. आरोपीकडून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई सावद्याचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावद्याचे एएसआय बशीर तडवी, हवालदार संजीव चौधरी, हवालदार विनोद तडवी, हवालदार मझहर पठाण, नाईक निलेश बाविस्कर आदींच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !