मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींमध्ये रावेरात फ्री स्टाईल हाणामारी


A free style clash between the beloved sisters of the Chief Minister रावेर (21 ऑगस्ट 2024) : लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय ठरली असून या योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा झाल्यानंतर बहिणींनी रक्कम काढण्यासाठी बँकेत तोबा गर्दी केली आहे मात्र वाढत्या गर्दीमुळे रावेरात चक्क दोन बहिणींमध्ये रांगेत नंबर लावण्यावरून चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे.

रावेरात बहिणींमध्येच हाणामारी
महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम काढण्यासाठी या लाडक्या बहिणींची भल्या सकाळीच बँकाबाहेर गर्दी होत आहे. त्यातच रावेरमध्ये एका बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी लावलेल्या रांगेत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरु आहे.

बँक कर्मचार्‍यांची मध्यस्थी
रावेरातील एका बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगेत दोन महिलांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही लाडक्या बहिणी हातघाईवर आल्या व काही वेळाने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. अखेर बँकेच्या कर्मचार्यांनी हस्तक्षेप करीत या लाडक्या बहिणीमधील वाद मिटवला मात्र संपूर्ण तालुक्यात या घडलेल्या प्रकारची चांगलीच चर्चा रंगली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !