अमळनेर तालुक्यात मूकबधीर बालिकेवर वयोवृद्धाचा अत्याचार
In Amalner taluka, a mute girl was abused by an elderly man अमळनेर (22 ऑगस्ट 2024) : अकोल्यासह बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकाराने समाजमन संतप्त झाले असताना अमळनेर तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय मूकबधीर अल्पवयीनावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलिसात वृध्दाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नराधमाविरोधात गुन्हा
अमळनेर तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय अल्पवयीन पीडीता वास्तव्यास आहे व पीडीता ही मूकबधीर आहे. पीडीतेची आई अहमदनगर येथे मजुरीच्या कामानिमित्त गेल्याने 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत राजधर अंबर सैंदाणे (70) याने पीडीतेसोबत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार गावातील महिलेने पाहिल्यानंतर पीडीतेच्या आईला फोन करून कळवला. पीडीतेची आई घरी आल्यानंतर बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव राजधर सैंदाणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.
