भुसावळात हद्दपार आरोपीसह मालेगावचे तिघे जाळ्यात : बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई


Three of Malegaon arrested along with deportation accused in Bhusawal : Big action by market police भुसावळ (23 ऑगस्ट 2024) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान हद्दपार आरोपीसह अन्य दोघांवर अस्तित्व लपवून फिरवत असल्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बुधवारी रात्री गस्तीवर असतांना बसस्थानकाच्या परिसरात मसुद अहमद मोहम्मद मोमीन (29, रा.अमीन मौलाना दर्गाजवळ, रमजान पुरा, मालेगाव) हा संशयीतरित्या फिरतांना आढळल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताची चौकशी केल्यानंतर त्याच्याविरुध्द नाशिक, मालेगाव, धुळ्यात 12 गुन्हे तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. त्याच्याविरूध्द कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

हद्दपार आरोपीसह दोघांना अटक
याच भागात मालेगाव येथील संशयीत आमीन खान उर्फ हमीद खान तालीब खान (28, रा.मदर अयसा कॉलेजजवळ, रमजान पुरा, मालेगाव) याला सुध्दा संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात मालेगावी दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातून 3 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला रहिम शमशेर पठाण (26, रा.गेंदालाल मिल, हुडको जळगाव, ह.मु.नेहाल नगर, अवलीया मशीदजवळ, मालेगाव) हा बाजारपेठ हद्दीत बुधवारी रात्री गस्तीवरील पोलिसांना मिळून आला. त्याच्याविरूध्द कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुध्द जळगावात चोरी, घरफोडी आदी प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !