विरावली येथील माहेर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ


A 27-year-old married woman from Viravalli was harassed for two lakhs यावल (25 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील विरावली येथील माहेर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेचा पतीसह सहा जणांनी छळ केला. माहेरून दोन लाख रुपये आणावे म्हणून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला व पैसे न आणल्याने माहेरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ
विरावली, ता.यावल येथील माहेर असलेल्या यास्मीन जावेद तडवी (27) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह मे 2010 मध्ये जावेद सलीम तडवी (ईस्लामपुरा, फैजपूर) या तरुणांसोबत झाला होता. विवाहानंतर आठ महिन्याच्या काळात विवाहितेने बांधकाम ठेक्याच्या कामासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे म्हणून पती जावेद तडवी, सासू सुपडाबाई तडवी, सासरे सलीम तडवी, जाकीर तडवी, आस्मा तडवी व असलम तडवी (सर्व रा.फैजपूर) यांनी विवाहितेचा छळ केला तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत पैसे न आणल्याने माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !