बोदवड तहसील कार्यालयाच्या शिपायाचा मारहाणीत मृत्यू


Constable of Bodwad Tehsil Office beaten to death बोदवड (25 ऑगस्ट 2024) : बोदवड तालुक्यातील मनूर येथे किरकोळ कारणावरून पती-पत्नीला गावातील संशयित आरोपींची बेदम मारहाण केली होती. या घटनेत पती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा दुपारी 12 वाजता मृत्यू झाला. विलास सीताराम पाटील (40, रा.मनूर, ता.बोदवड) असे मयताचे नाव आहे. मयत विलास हे बोदवड तहसीलला कर्मचारी होते. बोदवड पोलिसात याप्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे म्हणाले.

वादातून केली होती मारहाण
मनूरचे रहिवासी विलास पाटील व त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांना वादातून संशयीतांनी मारहाण करून जबर जखमी केले. यानंतर इतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विलास पाटील यांच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी दुपारी 12 वाजता विलास पाटील त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !