यावल तालुक्यातील 36 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : महिलेकडून फोटो व्हायरल


36-year-old married woman assaulted in Yaval taluka : Photo viral by woman यावल (26 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील एका गावातील 36 वर्षीय विवाहितेचा हात पकडून तिला जबरदस्ती एकाने शेतात ओढून नेत तिला विवस्त्र करण्यात आले व त्या अवस्थेत फोटो काढून अत्याचार करण्यात आला. यानंतर महिलेचे फोटो एका दुसर्‍या महिलेने पीडीत महिलेच्या नातेवाईकांना टाकले. ही घटना 23 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
यावल तालुक्यातील एका गावातील विनोद दोधू मेढे याने 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मारुळ रस्त्यावरील सुनील फिरके यांच्या केळीच्या शेतात एका 36 वर्षीय विवाहितेचा हात धरून ओढून नेले व तेथे जबरदस्तीने या महिलेच्या अंगावरील कपडे काढून तिला विवस्त्र केले. शरीर सुखाची मागणी करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. महिलेचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले व ते फोटो विमलबाई दिनेश बाबर हिने पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवले व व्हायरल केले. या दोघांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !