यावल-भुसावळ रस्त्यावर खड्डे चुकवतांना अपघात ; दुसखेडा येथील दाम्पत्य जखमी


यावल (29 ऑगस्ट 2024) : यावल-भुसावळ रस्त्यावरून दुचाकीव्दारे येणार्‍या एका दाम्पत्याच्या दुचाकीस खड्डे चुकवतांना अपघात झाला. यात दोघे जखमी झाले. अपघातानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व प्रथमोपचार करून त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला.

दुचाकी घसरल्याने अपघात
यावल-भुसावळ रस्त्यावरून नितीन आप्पा तायडे (35) व निशा नितीन तायडे (30, रा.दुसखेडा, ता.यावल) हे दुचाकीव्दारे मंगळवारी सकाळी यावल येथे येत असताना खड्डे चुकवत असतांना दुचाकीचा अपघात घडला. दुचाकीवरून पडल्यामुळे दोघांना दुखापत झाली. दोघांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.अनुजा चलाख, अधिपरिचारीका प्रियतमा पाटील, सुमन राऊत, अमोल अडकमोल यांनी उपचार केले. नितीन तायडे यांच्या हाताला फॅक्चर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !