बडतर्फ अधिकारी पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा

0

Respite to dismissed officer Pooja Khedkar till September 5 नवी दिल्ली (29 ऑगस्ट 2024) :l वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरला बडतर्फ करण्यात आल्यानंतर तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. दिल्ली पोलिसांनी पूजाच्या उत्तरावर विचार करण्यासाठी आणि नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी पोलिसांना पुढील कारवाई होईपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे निर्देश दिले.

युपीएससीची परीक्षा देता येणार नाही
युपीएससीने 31 जुलै रोजी पूजाची निवड रद्द केल्यानंतर तिला भविष्यात ही परीक्षा देता येणार नाही.

आयोगाच्या या निर्णयाला पूजाने आव्हान दिले आहे. 28 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर दाखल करताना तिने दावा केला की, यूपीएससीला निवड झालेल्या उमेदवारावर कारवाई करण्याचा अधिकार नाही.


कॉपी करू नका.