भुसावळात तोल जावून पडल्याने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू
A 55-year-old woman died after losing her balance in the bush भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : कपडे सुकवण्यासाठी वरच्या माळ्यावर दोरी बांधत असताना तोल जावून पहिल्या माळ्यावरून जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागून 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुद्वाराजवळील कुलकर्णी प्लॉटमध्ये बुधवार, 28 रोजी सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनप्रीतकौर अमरजीतसिंग ठेठी (55, कुलकर्णी प्लॉट, गुरुद्वाराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
तोल जावून पडल्याने मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, मनप्रीतकौर या आपल्या मुलासह गुरुद्वारासमोर वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्या कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या पहिल्या माळ्यावर गेल्या मात्र कपडे टांगण्यासाठी दोरी नसल्याने त्या खुर्चीवर उभ्या राहून दोरी बांधत असताना घराच्या पहिल्या माळ्यावरून त्यांचा तोल गेला व त्या जमिनीवर पडल्या. डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. स्थानिकांसह नातेवाईकांना घटना कळताच त्यांनी धाव घेत मनप्रीतकौर यांना रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहेत.

