‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ : प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती

0

‘Vande Bharat Sleeper Train’: Passengers get the feel of air travel नवी दिल्ली (1 सप्टेंबर 2024) : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर गाडीच्या प्रोटोटाइप मॉडेलचे रविवारी अनावरण केले. प्रवास आरामदायक व्हावा अशा पद्धतीने बर्थ आणि बोगींची रचना केली असून जणू प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती आता येार आहे. ताशी 160 किमी वेगाने ही धावणार आहे.

प्रवाशांना येणार विमान प्रवासाची अनुभूती
वंदे भारत ट्रेन पाठोपाठ आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावणार आहेत. इएचङ ने वंदे भारत ट्रेनच्या कोचची बांधणी केली असून, प्रोटोटाइप मॉडेलच्या माध्यमातून या ट्रेनचा पहिला लुक अखेर समोर आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचे अनावरण केले. ट्रेनच्या आतमधील दृश्य बघितले, तर प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती प्रवास करताना येणार आहे.

24 फर्स्ट क्लास एसी सीट्स
वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला एकूण 16 डब्बे असणार आहेत. प्रोटोटाईप मॉडेलमध्ये 11 एससी 3 टिअर कोच, 4 एससी 2 टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये एससी 611 थर्ड एससी सीट्स असणार आहे. तर 188 सेंकड एससी आणि 24 फर्स्ट क्लास एससी सीट्स असतील.

वाचन करण्यासाठी लाईट, चार्जिंग पॉईंट
प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी ट्रेनमध्ये वाचन करण्यासाठी लाईट आहे. त्याचबरोबर युएसबी चार्जिंग पॉईंट आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि टॉयलेटही आहे. उद्घोषणा करण्यासाठी व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहे. एसी फस्ट टिअरमध्ये गरम पाणी असेल.


कॉपी करू नका.