राज्यात विधानसभा निवडणूक कधी ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला ‘हा’ अंदाज

0

When is the assembly election in the state? Chief Minister Eknath Shinde made this prediction मुंबई (4 सप्टेंबर 2024) : राज्यात विधानसभेच्या निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अंदाज वर्तवला आहे. येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मुदत वाढवली आहे. पुढील काळात 1500 रुपयांची रक्कम वाढविण्यात येईल. या बरोबरच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू केल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शेतीसाठी वीज मिळावी म्हणून मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत चे मोफत उपचार देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणूक हरियाणासोबत झालेली होती पण यंदा हरियाणात विधानसभेची निवडणूक आधी होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


कॉपी करू नका.