वाघझिरा येथे बकर्‍या बांधण्याच्या कारणावरून प्रौढाला मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा


Man beaten up for tying goats in Waghzira : Crime against trio यावल (11 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील वाघझिरा या गावात बकर्‍या बांधण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून 43 वर्षीय इसमाला तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार, 9 सप्टेंबर घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
वाघझिरा, ता.यावल या गावातील रहिवासी फकीरा बिस्मिल्ला तडवी (43) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ते बकर्‍या बांधत होते. बकर्‍या बांधण्याच्या कारणावरून त्यांना संजय हुसेन तडवी, साबेरा संजय तडवी व शरीफ संजय तडवी या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाकडी काठीने त्यांना मारून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !