बहिणीला माहेरी नेण्यासाठी आलेल्या भावासह मित्राला चौघांची मारहाण : दगडी गावातील घटना
Brother and friend who came to take sister home beaten up by four: incident in Dagdi village यावल (12 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील दगडी या गावात सासरी असलेल्या बहिणीला घेण्यासाठी तिचा भाऊ मित्रासह आल्यानंतर बहिणीच्या पतीसह इतर चौघांनी या दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
दगडी, ता.यावल येथे बहिणीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आनंदसिंग लालसिंग भील (35, लोंढे, ता.शिरपूर) हा त्याचा मित्र सुरेश भालसिंग भीलसोबत आला होता. तेथे मेहुण्यांसोबत वाद झाला आणि या वादातून आनंदसिंग भील व सुरेश भील या दोघांना विजय उत्तम भील, इंदुबाई उत्तम भील व विजय भील याचा भाऊ अशा चार जणांनी यांना जबर मारहाण केली. लाकडी काठीने मारून त्यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली व त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आनंदसिंग भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसीन खान करीत आहे.

