मध्यप्रदेशातील तरुणावर भुसावळ बसस्थानकात प्राणघातक हल्ला


Madhya Pradesh youth assaulted at Bhusawal bus stand भुसावळ : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरच्या तरुणावर भुसावळ बसस्थानकाजवळ लोखंडी धारदार कटर पोटावरून मारून हल्ला करण्यात आला. बुधवार, 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

70 रुपये न दिल्याच्या रागातून हल्ला
रामकरण महेश कुशवाह हा तरूण आपल्या आई-वडील व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. तो भुसावळ बसस्थानक आवारात भूईमुंगाच्या शेंगा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे रामकरण हा बसस्थानकाच्या बाहेर परिवारासह उभा असतांना त्याच्या ओळखीचा जय राजू शिंदे हा तरूण तिथे आला. त्यावेळी त्याने रामकरण यांच्याकडे 70 रूपये मागत माझ्यासोबत चल असे सांगितले. त्यावर रामकरण याने नकार दिल्याचा राग येवून जय शिंदे याने खिश्यातून लोखंडी सारख्या धारदार शस्त्राने पोटावर वार करून त्याला जखमी केले.

त्यानंतर त्यांच्या आईसह परिवाराने जखमी अवस्थेत त्याला भुसावळातील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांची आई सुनीता महेश कुशवाह यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून जय राजू शिंदे (रा.लालबागा बर्‍हाणपूर मध्यप्रदेश) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !